How To Relieve Stress Quickly | चुटकीसरशी गायब करायचा असेल ‘स्ट्रेस’ तर जाणून घ्या तणाव दूर करण्याच्या 7 सोप्या पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Relieve Stress Quickly | तणाव (stress) कसा टाळता येईल असा विचार केला तर आजच्या जीवनात ती एक अशक्य गोष्ट असेल, पण तणावाचे परिणाम टाळण्याच्या उपायांचा विचार करत असाल, (How To Relieve Stress Quickly) तर काही सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीजच्या (Activities) मदतीने चुटकीसरशी तणाव दूर होऊ शकतो.

 

ओडेसी यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येतो जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. जास्त तणावामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack), पक्षाघात किंवा नैराश्य यासारखे आजार होऊ शकतात. अशा स्थितीत आपण तणावाच्या परिणामांपासून दूर राहून तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. (How To Relieve Stress Quickly)

 

तणाव दूर करण्याचे 7 मार्ग

 

1. श्वासोच्छवासाचा व्यायाम (Breathing exercises)
जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता आणि श्वास सोडता तेव्हा तो मेंदूला ऑक्सिजन पुरवठा वाढवतो, पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करतो आणि हृदय (Heart) गती कमी करतो. यामुळे आराम आणि शांत वाटते. त्यामुळे लक्ष केंद्रीत होते, तेही ताण न घेता.

 

2. दहा मिनिटांचा फ्रेश वॉक (ten minute fresh walk)
तणावातून झटपट आराम मिळवण्यासाठी तुम्ही थोडे चालू शकता. हा वॉक ब्रेक तुम्हाला रिफ्रेश होण्यास मदत करतो. आपण उद्यान किंवा बागेत हिरव्या गवतावर चालत असल्यास ते चांगले ठरू शकते.

 

3. सूदिंग म्युझिक करा ऑन (Make soothing music on)
जर तुम्ही तणावामुळे स्वतःला शांत करू शकत नसाल तर संगीतामध्ये मन शांत करण्याची ताकद आहे. म्हणूनच तुम्ही 10 मिनिटे कोणतेही सुखदायक संगीत ऐकू शकता. तुम्हाला हवे असल्यास ऑफिसमध्येही हेडफोनवर असे संगीत ऐकू शकता.

4. स्ट्रेस बॉलचा करा वापर (Use a stress ball)
जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीराचे स्नायू देखील घट्ट होतात. अशा स्थितीत हातात स्ट्रेस बॉल घेतला आणि तो वारंवार दाबला तर या रिपीट मोशनमुळे रक्तदाब कमी होतो आणि फोकस, क्रिएटिव्हिटी सुधारते.

 

5. ध्यान करा (Meditation)
जर कामाच्या दरम्यान ताण येत असेल तर तुम्ही 2 मिनिटे थांबा आणि दीर्घ श्वास घ्या.
आपले डोळे बंद करा आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फरक जाणवेल.

 

6. फुगा फुगवणे (Inflate the balloon)
तणावाच्या अवस्थेत फुगा फुगवणे हे ऐकायला विचित्र वाटेल, पण तणाव दूर करण्यासाठी ही एक प्रभावी कसरत आहे.
यामुळे ऑक्सिजन फुफ्फुसापर्यंत (Lungs) पोहोचतो आणि रक्ताभिसरण चांगले होते.

 

7. वाफ घेणे (To evaporate)
स्टीम हा तणाव दूर करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. साध्या पाण्याने किंवा एखादे अरोमा ऑईल टाकून वाफ घेतल्याने ताजेतवाने वाटेल.

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- How To Relieve Stress Quickly | health news how to relieve stress quickly simple activities pra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर, बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा