PM नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर रवाना, ‘असा’ आहे 7 दिवसांचा कार्यक्रम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आठवड्याच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी अमेरिकेत पोहोचतील आणि रविवारी रात्री त्यांना टेक्सासमधील ह्युस्टन येथे ‘हॉडी मोदी’ कार्यक्रमास ते संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाची तयारी सुरू झाली असून आता त्या स्टेडियमचे चित्रही समोर आले आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिकेचा पहिला दौरा आहे. 27 सप्टेंबर रोजी ते संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील.

‘हॉडी मोदी’ हा कार्यक्रम हॉस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर टेक्सास इंडिया फोरमच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 हजाराहून अधिक अनिवासी भारतीयांना संबोधित करतील. या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा सहभागी होतील.

असा असेल पंतप्रधान मोदींचा यूएस दौरा –

21 सप्टेंबर – पंतप्रधान मोदी भारतीय वेळेनुसार सकाळी 11:05 वाजता जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यूस्टन येथे दाखल होतील.

22 सप्टेंबर – भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता (स्थानिक वेळ -6:00 PM) पंतप्रधान हॉटेल पोस्ट ओक येथे तेल कंपन्यांच्या सीईओची भेट घेतील.
त्यानंतर सकाळी 6:00 वाजता (स्थानिक वेळ -7:35 PM) अनिवासी भारतीयांची भेट घेतील.

23 सप्टेंबर – मोदी हवामान परिषदेला संबोधित करतील.
दहशतवादाच्या मुद्यावर जगभरातील अनेक नेत्यांना भेटणार
अमेरिकन कॉंग्रेसच्या प्रतिनिधींसोबत बैठक.

24 सप्टेंबर: यूएनएसजीच्या दुपारच्या भोजनात सहभागी होतील.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतील.
गेट्स फाऊंडेशनतर्फे ग्लोबल गोलकीपर अवार्ड देण्यात येईल.
ब्लूमबर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह बैठक

25 सप्टेंबर: CARICOM बैठकीस हजेरी लावतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 20 नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

27 सप्टेंबर: युएनजीए अधिवेशनाला संबोधित करतील.

ह्युस्टनमध्ये पूरसदृश परिस्थिती –

सतत पडणाऱ्या पावसामुळे ह्युस्टनमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. टेक्सास राज्यातील अनेक शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बस-मेट्रो सेवेवरही परिणाम झाला आहे. ह्यूस्टनचे विमानतळ नुकतेच बंद करण्यात आले आहे. मात्र याचा ‘हॉडी मोदी’ कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यासाठी तब्बल 1500 स्वयंसेवक NRG स्टेडियमवर कामाला लागले आहेत.

visit : Policenama.com 

You might also like