‘या’कारणामुळं मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांची तासभर वाट पहावी लागली

ह्युस्टन : वृत्तसंस्था – ह्युस्टनमध्ये आलेल्या पुराचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. त्यानंतर ते हाऊडी मोदी कार्यक्रमात दाखल झाले होते.  त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रम्प यांची फार काळ वाट पाहावी लागली.

अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या  हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर एक तास पाच मिनिटं उशिरानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाखल झाले होते. ह्युस्टनमध्ये आलेल्या पुराचा आढावा घेण्यासाठी ट्रम्प यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. त्यानंतर ते हाऊडी मोदी कार्यक्रमात दाखल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ह्युस्टनमधल्या पूरग्रस्त भागात 5 लोकांना जीव गमवावा लागला आहे. ‘Howdy Modi’ कार्यक्रमाला येण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटसुद्धा केलं होतं. टेक्सासमधील आजचा दिवस अविस्मरणीय असेल, ह्यूस्टन येथे आज आपल्या मित्राबरोबर राहणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

कार्यक्रमात आल्यानंतर  ट्रम्प यांनी भाषण करताना म्हटले की, पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी या ऐतिहासीक कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने मी अत्यंत आनंदी आहे. भारत-अमेरिका एकमेकांचा सन्मान करतात. मोदी यांच्या कार्यकाळात संपूर्ण जग भारताला एका मजबूत देशाच्या रूपात पाहत आहे.

ह्युस्टनमध्ये  पूरसदृश परिस्थिती –

सतत पडणाऱ्या पावसामुळे ह्युस्टनमध्ये  पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर टेक्सास राज्यातील अनेक शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बस-मेट्रो सेवेवरही परिणाम झाला आहे. ह्यूस्टनचे विमानतळही काही काळासाठी  बंद करण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like