‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हृतिक रोशन ! घरापासून तर कारपर्यंत जाणून घ्या सारं काही

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा भारतीय सिनेमातील एक सुपरस्टार तर आहेच. याशिवाय तो एक उत्तम डान्सदेखील आहे. हृतिक 2019 मध्ये जगात सर्वात जास्त फी घेणारा अभिनेता आहे. आपल्या हँडसम लुक आणि परफेक्ट बॉडीमुळं त्याला बॉलिवूडमधील ग्रीक गॉड म्हणूनही ओळखलं जातं.

कहो ना प्यार है या सिनेमातून डेब्यू करणाऱ्या हृतिकनं आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याचा क्रिश हा भारतीय सिनेमातील पहिला सुपरहिरोही यशस्वी झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का हृतिकची संपत्ती किती कोटींची आहे.

हृतिक रोशनची 2020 मध्ये एकूण संपत्ती 2680 कोटी इतकी आहे. त्याचं कुटुंब जगभरातील शानदार अपार्टमेंट आणि बंगल्यांचं मालक आहे. दिल्ली, मुंबई, बँग्लोर अशा अनेक शहरातील पॉश एरियात त्याची घरं आणि संपत्ती आहे. मुंबईत त्याचं खासगी घर आहे ज्याची मार्केट व्हॅल्यु 84 कोटी रुपये इतकी आहे.

हृतिकच्या कार

हृतिक रोशनला कारचा खूप नाद आहे. त्याच्याकडे लग्जरी कार पोर्श आहे. ज्याची किंमत 1.22 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय त्याच्याकडे फेरारी, वोल्वो, ऑडी, मर्सिडिज अशा अनेक लग्जरी कार्स आहेत.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता.