शिखर बँक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात गेल्या वर्षी गुन्हे दाखल केले होते. राज्य मध्यवर्ती बँकेच्या कर्जवाटप प्रकरणात अनियमितता आढळल्यानं तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप नाबार्डच्या अहवालात आहे. नाबार्डनं दिलेल्या अहवालाच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 आरोपी बनवण्यात आले होते. या सर्वांना आता क्लीन चीट देण्यात आली आहे.

ईओडब्ल्यूच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) कोणतेही ठोस पुरावे न सापडल्यामुळं पोलिसांनी (एसीबी) न्यायालयात सी सारांश दाखल केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (ईओडब्ल्यू) आज क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. 25 हजार रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालीन संचाक मंडळवार ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेनं बर्खास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथिक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 70 जणांवर भा दं वि कलम 420, 406, 409, 465, 471, 120 ब, 34 आणि 367, भ्रष्टाचार प्रतिबंधंक कायद्याच्या कलम 1(ए) (बी) (सी) आणि 2 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यात शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यासह अन्य पक्षातील नेत्यांचा समावेश होता. साखर सहकारी संस्था, सूत गिरण्या आणि जिल्हा व सहकारी बँकांकडून प्रक्रिया करणाऱ्या अन्य उद्योग कंपन्यांनी घेतलेल्या मोठ्या कर्जीशी संबंधित तक्रार होती.