नारीशक्‍तीला सलाम ! ‘या’ महिलेनं २ वर्षात ४५ गावात बनवले तब्बल ८७ तलाव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये सध्या एक महिला तलाव बनवण्यासाठी जोमाने झटत आहे. मागील अडीच वर्षांपासून ही महिला बनासकांठा या गावात हे काम करत आहे. गावात सर्वात दुष्काळी परिस्थिती होती परंतू शेतात मात्र भरपूर पाणी देण्यात येत होते. कारण शेतकरी आपापल्या बोरवेल करुन घेतल्या होत्या. एका शेतकऱ्यांने तर १३ पाईप टाकून बोरवेल घेतली होती. त्यानंतर या महिलेने या गावात जाऊन लोकांची समजूत काढली. लोक पहिले एकण्यास तयार नव्हते मात्र बऱ्याच प्रयत्ननंतर लोकांना थोडीफार समज आली. पाण्यासाठी झटणाऱ्या या महिलेचे नाव आहे मित्तल पटेल. त्यांचे एकच लक्ष आहे गावात तलाव बनवणे.

त्यांनी लोकांना कल्पना दिली की आपण गावात तलाव खोदू, यावर लोक त्यांच्यावर हसले होते. या गावातील अनेक लोक शिकलेले होते परंतू त्यांनी काहीही समजून घेतले नाही, उलट लोकांना पटेल यांना सांगिलते की या जमाण्यात कोणी तलाव बांधत का. परंतू त्यांनी हार न मानता दिवस दिवस भर गाव फिरुन लोकांना समजावून सांगितले त्यांना अनेक व्हिडिओ दाखवले त्यांनंतर कुठे लोकांना विश्वास बसला आणि लोक तलाव खोदण्यासाठी तयार झाले.

लोकांचा पहिल्यांदा विरोध
लोकांना वाटत होते की, तलाव खोदने आणि त्याची देखभाल करणे हे सराकारी काम आहे. गावकऱ्यांना यावर पैसे लावण्यात थेट नकार कळवला होता. त्यावेळी पटेल यांनी स्वखर्चातून जेसीबी आणण्याची आणि माती काढण्याची तयारी दर्शवली होती, मात्र ट्रक तुम्हाला आणावे लागतील असे म्हणल्यावर तर लोक १ रुपया देखील देण्यास तयार नव्हते. यावर उपाय म्हणून पटेल यांनी ट्रक आणण्याची तयारी दाखवली आणि गावातील लोकांना जेवण देण्याची मागणी केली. परंतू यासाठी देखील लोकांनी नकार दिला होता.

महिलांनी देखील हातात घेतले कुदळ फावडे
परंतू अनेक प्रयत्नानंतर लोक तयार झाले, परंतू अडचणी मात्र अनेक होत्या. लोक तलाव खोदण्यास तयार झाले काही ठिकाणी कामे करण्यात आली मात्र अनेक ठिकाणी लोक अर्ध्या कामानंतर थकले. अनेकांना विचारले की मग बोरवेलमध्ये काय वाईट आहे. अनेकदा समजावून अखेर यांना समज येत असतं. एक पुर्ण वर्ष असे गेले की सर्व लोकांनी यात सहभाग घेत जोमाने काम करण्यास सुरुवात केली. सर्व गाव तलाव सेवा करण्यात गुंतले होते. अनेक जणांना आपल्या घरातील कामे वाटून घेत लोक तलाव खोदण्यासाठी उतरले होते. गृहिणी देखील घरातील कामे लवकर उरकून तलाव खोदण्यात सहभागी झाल्या.

४५ गावात बनवले ८७ तलाव
अनेक गावातील पैसा असणाऱ्या लोकांना थोडे थोडे पैसे जमा करुन ते माती उचलण्यासाठी ट्रक आणण्यात लावले. मोठ्या प्रमाणात गावागावत खड्डे खोदण्यात आलत. त्यात पाणी साठवण्यात येत आहे. काही गावातील सरपंचानी प्रयत्न करुन नर्मदा नदीचे पाणी तलावापर्यंत आणले. आणि तलावात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. काही गावात आता तलाव तयार आहेत, पाण्याने भरले आहेत. तर काही गावात आता पाऊस पडून तलाव पाण्याने भरण्याचा प्रतिक्षेत आहेत. मागील दोन वर्षात ४५ गावांमध्ये ८७ तलाव खोदण्यात आले आहेत.

आधी त्या लोकांना तलाव बनवण्यासाठी सांगत होत्या, आता मात्र लोकांना एक मोठी यादी त्यांच्या हातात दिली आहे की कुठे कुठे तलाव खोदायचे आहेत. परंतू आता पटेल यांना चिंता आहे ती पावसाची, कारण पाऊस असतील तर सुकलेले तलाव भरतील. आणि लोकांना देखील आपल्या कामाला यश आल्याचे दिसेल.

आरोग्यनामा विषयक

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर