पत्नीनं स्वतःच कपाळावरील ‘कुंकू’ पुसलं, नंतर पतीसोबत केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रेदशमधील पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेला या प्रकरणी अटक केली असून मृत इसमाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील 30 वर्षीय सुनील हा  आपली पत्नी अंजली आणि दोन मुलांसह राहत होता. तीन दिवसांपूर्वी तो फिरोजाबादमध्ये आला होता. यावेळी बुधवारी रात्री पत्नी अंजली आणि त्याच्यामध्ये काही कारणावरून वाद झाले. यावेळी नातेवाईकांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता पत्नी त्याचा गळा आवळलेल्या अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी तिच्या तावडीतून सुनीलची सुटका केली असता तो मृत आढळून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना यासंबंधी सूचना दिली. मृत व्यक्तीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीचे अनैतिक संबंध होते. यावेळी पोलिसांनी तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे.

चार वर्षांपूर्वी झाला होता विवाह
सुनील कुमार याचे लग्न चार वर्षांपूर्वी बिहारमधील अंजली हिच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगा असून चार महिन्यांची मुलगी देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील याला दारूचे व्यसन होते आणि हे पती पत्नीमधील वादाचे प्रमुख कारण होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like