लॉकडाऊनमध्ये जोडप्यानं घरातच सुरू केला ‘जोड’धंदा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, रूमचं मिळत होतं ‘एवढं’ भाडं

पंजाब : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान, वेश्या व्यवसायातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ महिलांसह ७ जणांना अटक केली असून, पोलिस तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेश्या व्यवसाय चालवणारी प्रमुख महिला काही पैशांसाठी तिची खोली भाड्याने देत होती.

पंजाब पोलिसांनी सदरील वेश्या व्यवसाय प्रकरण उघडकीस आणलं आहे. बरनाला पोलिसांनी या प्रकरणात ३ महिला आणि ७ पुरुषांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी सांगितलं की, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे. लॉकडाऊनमध्ये पैसे कमवायचा हाच एक मार्ग असल्याचं यातील एका आरोपीने म्हटलं.

या वेश्या व्यवसाय प्रकरणात ताब्यात असलेली प्रमुख महिला आरोपी पोलिसांनी म्हणाली की, ती आणि तिचा पती सतत आजारी असायचे. म्हणून त्यांना काम करणं शक्य नव्हते. त्यामुळे काही मुलं मुलींना घरी आणायचे आणि त्याचे आम्हाला ५०० रुपये मिळायचे. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकची माहिती देताना महल कलांच्या एसपी प्रज्ञा जैन यांनी सांगितलं की, ‘छिनीवाल खुर्द या गावात एका घरात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी घरावर छापा टाकला. त्यामध्ये घराची मालकिन आणि इतर २ महिला तसेच ७ पुरुषांना घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं. तरी या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.