‘मी पुण्यातील पीआय बोलतोय – माझ्या मुलाला सोडा’, पोलिस निरीक्षक म्हणाले – ‘आम्हाला खोलात जाण्याची वेळ आणू नका, ते जमणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलिसांकडून जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. परवाना असलेल्यांनाच फक्त जिल्हा बदली करण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र, काही लोक विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशीच एक कारवाई श्रीगोंदे पोलिसांनी केली आहे. पकडण्यात आलेल्या दुचाकीस्वाराने आपण पोलीस निरीक्षकांचा मुलगा असल्याचे सांगित्यानंतर देखील पोलिसांनी दुचाकीस्वाराकडून दंड अकारुन सोडून दिले. ही घटना 13 जुलैपुर्वीची आहे.

झाले असे की, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाचा मुलगा श्रीगोंद्यात मोटारसायकलवरुन आला आणि पोलिसांच्या गस्तीत पकडला गेला. त्याने आपल्या स्टईलमध्ये माझे वडील पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. मला जाऊ द्या. कारवाईमध्ये दंग असलेल्या पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळातच त्या मुलाच्या वडिलांचा श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दैलत जाधव यांना फोन आला.

समोरच्या व्यक्तीने आपण पीआय बोलतोय, आपण पकडलेला माझा मुलगा आहे, त्याला सोडून द्या असे सांगितले. त्यावर जाधव यांनी साहेब आम्हाला अजून खोलात जाण्याची वेळ आणू नका, परवाना तपासावा लागेल असे म्हणताच समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. मुलाने देखील वाद न करता दंड भरला आणि तेथून काढता पाय घेतला. श्रीगोंद्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

प्रशासनकाडून कडक धोरण घेतले असताना काही दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करत आहेत. प्रशासनाकडून डबल शीट आणि ट्रिवपल शिट दुचाकीस्वारंकडून दंड वसूल केला जात आहे. शिवाय पालिका देखील दंडात्मक कारवाई करत आहे. अशीच कारवाई करत असताना पोलिसांचा मुलगा कारवाईत अडकला. त्याने पोलिसांना सांगून देखील पोलीस ऐकत नसल्याचे पाहून आपल्या पोलीस निरीक्षक वडिलांना फोन लावला.

पोलीस निरीक्षक असलेल्या वडीलांनी जाधव यांना फोन केला.जाधव यांनी त्यांना सांगितले की, संयुक्त कारवाई सुरु असून पत्रकार सोबत आहेत. दंड भरण्यास सांगा, अजून खोलात गेलो तर पुन्हा परवाना तपासावा लागेल, असे सांगताच समोर असणाऱ्या त्या मुलाने दंडाची रक्कम भरुन तेथून काढता पाय घेतला.

सहकारी पोलीस निरीक्षकांचा फोन आला होता. मात्र, त्यांचा मुलगा चुकला दंड वसूल केला. तो पुणे जिल्ह्यातून येथे आला होता. कारवाईची गर्दी असल्याने केवळ दंड वसूल केला, असल्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सांगितले.