…म्हणून मी अस्वस्थ झाले, पंकजा मुंडेंनी स्वतः केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपली मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकात पाटील देखील उपस्थित होते. भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. खडसेंनी देखील राज्यातील भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला. पंकजा मुंडेंनी या मेळाव्यासाठी आपल्या समर्थकांना फेसबूक पोस्ट करत मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. माझ्या मनात खदखद नव्हती. मात्र 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर ज्या ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले. मी पॉवरगेम खेळते आहे, मी विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे अशाही काही चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते अशी घोषणा केली असेही पंकजा मुंडेंना स्पष्ट केले.

मी हे पद स्वत:साठी सोडलं असं सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भाजप सोडणार नाही, पराभवाने मी खचून गेले नाही. मी निर्णय घेतलाय की कोअर कमिटीत राहणार नाही. याला कारण ही तसंच होतं. 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या 12 दिवसात ज्या काही चर्चा रंगल्या त्यामुळे मी हा निर्णय घेतला. त्यामुळे हे पद मी स्वत:साठी सोडलं.

पंकजा मुंडे नेमकं मेळाव्यात काय म्हणाल्या –
आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. मी आमदार देखील नाही त्यामुळे पक्षाने मला कोअर कमिटीतून मुक्त करावे अशी मागणी गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केली होती. तसेच मी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय सुरु करुन नवीन वज्रमूठ तयार करणार आहे, मी मशाल घेऊन ठिकठिकाणी राज्यभर दौरा करणार असे म्हणत पुढील राजकीय कार्य गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मार्फत करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी यावेळी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like