दिल्ली विधानसभा : तुम्हीच सांगा मी तुमचा ‘मुलगा’-‘भाऊ’ आहे की ‘आतंकवादी’, भाजपाच्या टीकेला केजरीवालांचं ‘ठासून’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दहशतवादी म्हणल्यानंतर अरविंद केजरीवाल देखील या मुद्याला धरुन लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले की त्यांनी दिवस रात्र काम करुन लोकांची सेवा केली आणि त्या बदल्यात भाजपने त्यांना दहशतवादी म्हणले. सीएम केजरीवाल म्हणाले की भाजपवाले म्हणत आहे की केजरीवाल दहशतवादी आहे. मी 5 वर्ष तुमचा मुलगा म्हणून काम केले. आता हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो की मी तुमचा मुलगा आहे की दहशतवादी. केजरीवाल बुधवारी म्हणाले की हा निर्णय दिल्लीच्या लोकांवर सोडतो की ते मला मुलगा मानतात, भाऊ मानतात की दहशतवादी.

केजरीवाल म्हणाले, मी माझे जीवन देशाच्या सेवेत लावले आहे. मधुमेह असताना भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण केले. मधुमेह असल्यामुळे मी एका दिवसात चार वेळा इन्सुलिन घेतो. जर मधुमेहाचा एखादा व्यक्ती इन्सुलिन घेत नाही तर 3-4 तास काही घेतले नाही तर तो बेशुद्ध होतो, एवढेच नाही तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा स्थितीत देखील मी भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण केले. एकदा 15 दिवस आणि एकदा 10 दिवस.

भाजप खासदार प्रवेश शर्मा केजरीवाल यांना दहशतवादी असल्याचे म्हणल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आहेत, यावर बोलताना केजरीवाल म्हणाले, ते लोक कल्याणासाठी रात्रंदिवस काम करतात. त्यांनी ट्विट केले की पाच वर्ष दिवसरात्र मेहनत करुन दिल्लीसाठी काम केले. दिल्लीकरांसाठी सगळा त्याग केला. राजकारणात आल्यानंतर कठीण परिस्थितींचा सामना केला, जेणे करुन लोकांचे जीवन सुखी होईल. एवढे करुन आज मला भाजपने दहशतवादी ठरवले याचे खूप दु:ख होत आहे.