‘इन्कम टॅक्स’च्या देशभरातील धाडीमध्ये 3300 कोटींच्या ‘हवाला’ रॅकेटचा ‘पर्दाफाश’, मोठ्या ‘कॉर्पोरेट हाऊस’चा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने सोमवारी 3,300 कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला असून दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांचा कारभार मोठ्या प्रमाणात पसरला होता. या टोळ्यांचा भारतातील मोठ्या Corporate Houses शी संबंध असल्याची माहिती देखील उघड झाली आहे.

42 ठिकाणी मारले छापे
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, कर चोरी प्रकरणातील या घोटाळाप्रकरण उघड करण्यासाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, इरोड, पुणे, आग्रा आणि गोवासह एकूण 42 ठिकाणी छापे टाकले. मात्र ज्या संस्थांवर छापे टाकण्यात आले आहेत, त्यांची नवे उजेडात आणलेली नाहीत.

सार्वजनिक सुविधांसाठी वापरण्यात येणार होती हि रक्कम
जप्त करण्यात आलेली हि रक्कम सार्वजनिक सुविधांसाठी वापरण्यात येणार होती. हवाला एजन्सीच्या माध्यमातून हि रक्कम विविध ठिकाणी पाठवण्याचे काम होत असे. यामध्ये संबंध असलेल्या या कंपन्या मुख्यवे मुंबई आणि दिल्लीमधील असून एप्रिलमध्ये देखील अशाचप्रकारे एका कंपनीवर छापा टाकण्यात आला होता.

आंध्र प्रदेशमधील महत्वाच्या व्यक्तीला दिले 150 कोटी रुपये
या घोटाळ्यातील रक्कम हि आर्थिकरित्या कमकुवत असणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी वापरण्यात येणार होती. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधील महत्वाच्या व्यक्तीला 150 कोटी रुपये दिले गेल्याचे पुरावे देखील बोर्डाला मिळाले आहेत.

Visit : Policenama.com