‘शरद पवार साहेब पंतप्रधान व्हावे वाटते पण….’ : माजी मंत्री पाचपुते

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पवार साहेब पंतप्रधान व्हावेत, हे मला आजही वाटते. मात्र ते अजूनही 1991च्या निवडणुकीतच गुंतले आहेत, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना शरद पवार यांना राजकारणातील पांडुरंग मानणारे परंतु सध्या भाजपमधील असलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले की, ‘शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत, हे पूर्वी वाटत होते. तसे आजही वाटते. मात्र साहेब अजूनही 1991च्या निवडणुकीतच गुंतल्याने, ते नव्हे तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी डॉ. विखे यांना दिल्याचे आपणाला सांगितल्यावर मी सुजय विखे पाटील यांना सावध केले. अनुराधा नागवडे, प्रशांत गडाख, अशी नावे चर्चेत आणून डॉ. सुजय यांना डोक्यावरून टाकण्याची चाल राष्ट्रवादी’ खेळत होती. त्यांना जिंकायचे असेल तर भाजप हाच पर्याय असल्याचा सल्ला दिला. तो त्यांनी मानला’, असेही पाचपुते म्हणाले.

नागवडेच कार्यकर्ते व तेच प्रचारप्रमुख

अनेक जण शंका घेत आहेत. मात्र निष्ठावंत ही माझी ख्याती आहे. काळजी करू नका. आज जेथे आहे. तेथेच विधानसभेलाही राहीन. ‘राष्ट्रवादी’कडून सूडाचे राजकारण होत असेल, तर आम्हाला विचार करावा लागेल. दक्षिणेतील काँग्रेस संपली असून, केवळ
प्रचारप्रमुख राजेंद्र नागवडे हे एकटेच पक्षात आहेत. तेच नेते आणि तेच कार्यकर्ते आहेत, असे विधान काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदावरून डच्चू दिलेले अण्णासाहेब शेलार यांनी केले.