‘मला एका बॉयफ्रेन्डची इच्छा, पण देव जास्त देत असेल तर नाही कसं म्हणू’, दिशा पाटनीनं सांगितलं (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यात ती एकापेक्षा जास्त बॉयफ्रेंडची इच्छा बोलत आहेत. हे पाहून चाहत्यांसोबतत तिचा कथित बॉयफ्रेंडटायगर श्रॉफलाही झटका लागू शकतो.

दिशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात ती म्हणते, मला नेहमीच एक बॉयफ्रेंड ठेवण्याची इच्छा होती. परंतु देव जर मला 4 किंवा त्यापेक्षा जास्त बॉयफ्रेंड देत असेल तर त्याला नकार देणारी मी कोण.

दिशाचा हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेटं करत तिचं कौतुक केलं आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.