एकेकाळी हॉटेलमध्ये ‘वेटर’ म्हणून काम करायचा, आज IAS अधिकारी, सातव्या वेळेस ‘यश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  स्वतःवर विश्वास ठेवला तर यश नक्कीच प्राप्त होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे के जयगणेश. हॉटेलमध्ये एक वेटर म्हणून काम करणाऱ्या जयगणेशने स्वतःवर विश्वास ठेवत आज आयएएस अधिकारी बनला आहे. के. जयगनेशचा जन्म तामिळनाडूमधील उत्तर अंबरजवळील एका लहानशा गावात झाला. त्याचे वडील एका कारखान्यात काम करतात आणि कुटुंबाचे पालनपोषण करतात.

जयगणेश सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता. तो बारावीत ९१ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. यानंतर त्याला तांती पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळाला. जेथे त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. यानंतर, त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली, जिथे त्याला दरमहा २५०० रुपये पगार मिळू लागला. जयगनेशचे मन नोकरीत लागत नव्हते.

या नोकरीच्या पगाराने आपल्या कुटुंबाचे भागणार नाही, तसेच त्याला स्वतःच्या गावाच्या विकासासाठीही काम करायचं होते. यासाठी सरकारी नोकरी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यांनतर त्याने परीक्षेची जोरदार तयारी सुरु केली आणि परीक्षाही दिली. मात्र, अनेक वेळा त्याला अपयश मिळाले. स्वतःचा खर्च सांभाळणेही त्याला अवघड जात होते.

म्हणून त्याने आपला खर्च भागवण्यासाठी त्याने एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यास सुरवात केली. तो दिवसा वेटर म्हणून काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. यावेळी त्यांनी इंटेलिजेंस ब्युरोची परीक्षा दिली आणि त्यातही यशस्वी झाला. त्यामुळे त्यांच्यासमोर एक गंभीर समस्या उद्भवली कि, नोकरीत जॉइन व्हावे की, ७ व्या वेळी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला हजर रहावे.

शेवटी त्याने ठरविले की, आपण नोकरी करणार नाही, आणि आपली तयारी सुरूच ठेवणार. त्यांनी सातव्या वेळी सिव्हिल परीक्षा दिली आणि यावेळी त्यांना यश आले. या परीक्षेत त्याने १५६ वा क्रमांक मिळविला. स्वतःवर विश्वास आणि सतत मेहनत करणे हे त्याच्या यशाचे कारण बनले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/