अभिमानास्पद ! आणखी एका अमेरिकी कंपनीचा ‘बॉस’ बनला ‘भारतीय’, 6 एप्रिलपासून IBM चं CEO पद सांभाळणार अरविंद कृष्णा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेमधील मोठी कंपनी म्हणून असलेल्या आयबीएमच्या सीईओ पदी आता भारतीय अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 57 वर्षीय अरविंद कृष्णा 6 एप्रिल पासून आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कृष्णा हे आयबीएममधेच क्लाउड आणि कॉग्निटिव सॉफ्टवेयरसाठी काम करत होते.

अरविंद हे आयबीएम सिस्टीम आणि टेक्नोलॉजी ग्रुपचे डेवलेपमेंट आणि मैन्युफैक्चरिंग ऑर्गनाइजेशनचे जनरल मॅनेजर देखील होते. 1990 मध्ये त्यांनी ही कंपनी जॉईन केली होती. अरविंद यांच्या नियुक्तीबाबत सध्याच्या वर्जीनिया रोमेटी यांनी म्हंटले की, आयबीएमच्या पुढील काळासाठी अरविंद हे उत्तम सीईओ आहेत. तसेच तंत्रज्ञानाविषयी त्यांना खूप अधिक प्रमाणात माहिती देखील आहे.

जाणून घ्या अरविंद कृष्णा यांच्या बद्दल
अरविंद यांनी IIT कानपूरमधून आपली पदवी संपादन केली आहे. त्यांनी यूनिवर्सिटी ऑफ इलनॉइज, अर्बाना शैंपेन मधून पीएचडी देखील केली आहे. तसेच अरविंद हे चांगले ऑपरेशन लीडर देखील आहेत.