पोलीस असल्याची बतावणी करून औषध व्यापाऱ्याला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस असल्याची बतावणी करत स्कॉर्पिओतून आलेल्या ५ जणांनी गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या एका औषध व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करत लुबाडले. व्यापाऱ्याला कारमध्ये बसवून बेळगावच्या दिशने नेऊन त्याच्याकडील २ लाख रुपये घेत त्याला जंगलात सोडून देणयात आले. ही घटना आंबोली परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी येथील औषध व्यापारी आणि काही मित्र गोव्याहून इचलकरंजीकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पाच जण स्कॉर्पिओतून आले. त्यांनी व्यापाऱ्याच्या गाडीला अडवून पोलीस असल्याचे भासवले. त्यानंतर व्यापाऱ्याला मारहाण करत आपल्या गाडीत बसवून बेळगावच्या दिशेने नेले.

त्यानंतर त्यांच्याकडील २ लाख रुपये आणि दागिने काढून घेत त्यांनी व्यापाऱ्याला शिनोली जवळच्या जंगलात सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु केली असून पुढील तपास सुरु आहे.

Loading...
You might also like