Coronavirus : ‘कोरोना’ला दूर ठेवायचंय मग ‘या’ 5 गोष्टी करा नियमित, तज्ज्ञांनी सांगितलं

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. या आजारावर अद्याप कोणतेही औषध मिळालेले नाही. जगभरातील तज्ञ या व्हायरसवर लस शोधत आहेत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी जगभरातील तज्ञ आणि डॉक्टरांनी काही सल्ले दिले आहेत. त्यातील ५ महत्वाच्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या पाहिजेत, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

या ५ गोष्टी नियमित करा …

सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि स्वच्छता – कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सतत हात धुणे आणि सरकारने सांगितलेल्या इतर सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही राहणाऱ्या परिसरात या गोष्टींचे पालन केले पाहिजे. तेव्हाच कोरोनाला रोखण्यात मदत होईल. तसेच घराबाहेर पडू नये.

योग्य आहार घेणे – सध्या कोरोनामुळे योग्य आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात असल्याने अनेकजण त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खात आहेत. पण यामुळे पचनशक्ती बिघडते, त्यामुळे आरोग्याला पूरक, हलके आणि फायबरयुक्त अन्न खाणे गरजेचे आहे.

नियमित व्यायाम करा – आपल्या शरीराला प्रतिकार शक्ती अत्यंत आवश्यक असते, त्यामुळे ती वाढण्यासाठी दररोज किमान ४० मिनिटे तरी व्यायाम केला पाहिजे. त्यात योग, प्राणायाम, ध्यान हे असले पाहिजे. हे केल्याने तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

पुरेशी झोप घेणे – बरेच जण रात्री उशिरा पर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. अशाने शरीराच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दररोज ६ ते ८ तासाची झोप आवश्यक असते. त्यामुळे थकवा दूर होऊन फ्रेश वाटते.

पॉजिटीव्ह थिंकिंग – सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकांना नकारात्मक विचार सतावत असतील. आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशात मानसिक आरोग्य व्यवस्थित असणे आवश्यक आहे. नकारात्मक विचारांमुळे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते. त्यामुळे सतत सकारात्मक विचार करणे, चांगली पुस्तकं वाचणे, गाणी ऐकणे, आवडते काही छंद असल्यास ते केल्याने देखील मानसिक आरोग्य चांगले राहू शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like