IMD Warning : ‘महा’ चक्रीवादळ झालं अधिकच ‘शक्तिमान’, ‘या’ राज्यात मुसळधार पावसाचा ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान विभाग ( IMD ) नुसार, चक्रीवादळ ‘महा’ मुळे महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि गुजरातच्या काही भागांमध्ये 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मोठा पाऊस येऊ शकतो. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘महा’ चक्रीवादळ होत आहे अधिक शक्तिशाली
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात सुरु असलेले महा चक्रीवादळ येत्या चोवीस तासांमध्ये अधिक प्रभावी होणार आहे. या वादळामुळे 7 नोव्हेंबर रोजी पोरबंदर आणि दिवमध्ये जोरदार अतिवृष्टी होऊ शकते. तसेच येत्या चोवीस तासांमध्ये अंदमान, निकोबार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुद्धा जोरदार वृष्टी होऊ शकते.

या राज्यामध्ये होणार जोरदार पाऊस
त्यासोबतच केरळ, तामिळनाडूच्या अंतर्गत भागात, कोकण गोव्यातील काही भागांमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो. त्याचप्रमाणे गुजरात, पूर्व भारत, जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे ओरिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर देखील जोरदार पाऊस होऊ शकतो.

Visit : Policenama.com