कांदा निर्यात बंदीचे पडसाद ! दर एक हजार रुपयांनी कोसळले

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निर्यात बंदी चे पडसाद उमटताच शेतकऱ्यांनी माजी पं स सभापती शिवा सुरासे यांच्या यांच्या सह शेतकरी बांधवांनी अर्धा तास रास्ता रोको केला त्यानंतर कांदा लिलावाला सुरुवात होताच कांद्याच्या सरासरी दरांमध्ये एक हजार रुपयाची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत लिलाव बंद पाडले. सकाळी सहा वाहनांचा लिलाव झाला यात कांद्याला सर्वोच्च २२०० रुपये प्रति क्विंटल तर सरासरी १९०० रुपये भाव जाहित झाला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती या शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जातात मात्र शेतकरी प्रतिनिधी करत असलेले एकही संचालकाने या आंदोलनात न आल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळण्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हायच्या आतच वाढणाऱ्या कांद्याच्या दराला आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक १४ रोजी निर्यात बंदीची घोषणा केली आणि त्याचे पडसाद येथील बाजार समितीत कांदा भावावर पडले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये 750 वाहनांची आवक बंद झालेली होती मात्र फक्त सहा वाहनांचा लिलाव झाला मात्र कालच्या तुलनेमध्ये कांदा दरामध्ये एक हजार रुपयांची घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.