Live टेलीकास्टमध्ये बिजनेसमननं शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या नेहा धुपियाला उचलून घेतलं, पुढं झालं ‘असं’ काही ! आता होतेय प्रचंड ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री नेहा धुपियाचा 12 वर्ष जुना फोटो समोर आला आहे. तिला वाटलंही नसेल की, यामुळं तिला कधी ट्रोलिंगची शिकार व्हावी लागेल. नेहानं व्हर्जिन मोबाईल लाँचिंग दरम्यान तयार केलेल्या व्हिडीओ दरम्यान बिजनेसमन रिचर्ड ब्रॅन्सन(Richard Bsanson) केलेल्या वर्तणुकीसाठी तिला ट्रोल केलं जात आहे.

https://www.instagram.com/p/B-d02koHmMg/?utm_source=ig_embed

2008 मध्ये भारतात नवीन सेलफोन सर्व्हीस आली होती. व्हर्जिन मोबाईल असं तिचं नाव आहे. याला प्रमोट करण्यासाठी 20 मिनिटांचा व्हिडीओ बनवला होता. याचं नाव होतं अपना अंदाज व्हेरी हटके. मुंबईतून चॅनल व्हीवर याचं लाईव्ह ब्रॉडकास्टींग झालं होतं. यात शेवटी डान्सर्स सोबत नेहा धुपिया आणि रिचर्ड ब्रॅन्सन डान्स करतान दिसले. गाणं संपताना रिचर्डनं अचानक नेहाला उचलून घेतलं. तिचं डोकं खालच्या बाजूला झालं. यावेळी नेहानं रेड शॉर्ट ड्रेस घातला होता. रिचर्डच्या या वागणुकीमुळं खुद्द नेहाही शॉक झाली होती.


इंस्टावरून हा फोटो समोर आला आहे. यानंतर लोक आता नेहाला ट्रोल करताना दिसत आहेत. काहींनी तर कमेंट केली की, इट्स हर चॉईस. इतरही अनेक युजर्स आहेत जे कमेंट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रोडिजमध्ये नेहा एका मुलाला त्यानं गर्लफ्रेंडला कानशीलात लगावल्यावरून बोलली होती ज्यामुळं ती प्रचंड ट्रोल झाली होती. आता तर ती 12 वर्ष जुन्या फोटोमुळं ट्रोल होताना दिसत आहे.

You might also like