पुणे : पोलीस चौकित महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

नऱ्हे पोलीस चौकित महिला पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ करुन धक्कबुक्की केल्याची घटना ताजी असतानाच काशेवाडी पोलीस चौकित महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. चौकिमध्ये दिलेल्या तक्रारीचे काय झाले अशी विचारणा करुन दोन महिलांनी चौकितील पोलीस नाईक निलम शिंदे यांना धक्काबुक्की केली. तसेच चौकीतील महत्वाचे रजिस्टर फेकून दिले. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या अंकीत असलेल्या काशेवाडी पोलीस चौकित रविवारी (दि.१६) रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

[amazon_link asins=’B0785JJF7L,B07D9G1GHB,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc43d19f-ba67-11e8-9cfc-c320ddfa3219′]

याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निलम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी काशेवाडी पोलीस चौकिमध्ये तक्रार नोंदवली होती. या महिला काल रात्री पोलीस चौकित आल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीचे तुम्ही काय केले, आम्हाला शिवगाळ करणाऱ्या महिला मोकाट फिरत आहेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही अशी विचारणा करुन पोलीस नाईक निलम शिंदे यांच्याशी वाद घातला. आरोपी महिलांनी शिंदे यांना शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच चौकित गोधळ घातला.

यापुढे भाजपचा प्रचार करणार नाही : रामदेव बाबा

पोलीस नाईक शिंदे यांनी या दोन महिलांना शांत बसण्यास सांगितले. मात्र महिलांनी शिंदे यांच्या अंगावर धाऊन जात त्यांचा सरकारी गणवेश फाडला. तसेच पोलीस हवालदार दिघे यांच्या समोरील अदखलपात्र रजिस्टर व ड्युटी रजिस्टर ओढून घेऊन फेकून दिले. पोलीस हवालदार दिघे आणि पोलीस नाईक निलम शिंदे हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पोमण करीत आहेत.