‘रमजान’मध्ये दीपिका कक्करकडून झाली ‘ही’ चूक ! ‘अशी’ होती सासरच्यांची ‘रिअ‍ॅक्शन’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही स्टार दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची जोडी चाहत्यांना खास आवडते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. दीपिका सध्या शोएबच्या कुटुंबासोबत रमजान सेलिब्रेट करत आहे. अशात इफ्तारीसाठी ती अनेक पक्वान्न बनवत आहे. अशात दीपिकाकडून एक चूक झाली आहे ज्यामुळं ती नाराज होते.

दीपिकाकडून किचनमध्ये काम करताना एक चूक झाली ज्यामुळ ती जरा नाखुश दिसून आली. यानंतर दीपिकाची ननंद आणि शोएबची इंट्रेस्टिंग रिअॅक्शन देताना दिसत आहे. दीपिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_eBFgxneTH/?utm_source=ig_embed

किचनमध्ये दीपिका दूध गरम करत होती. परंतु जास्त वेळ उकळलं गेल्यानं ते दूध भांड्यातून बाहेर सांडलं. यामुळं गॅसही खराब झाला. यानंतर तिला ते सगळं साफ करावं लागलं. यावेळी तिची ननंद व्हिडीओ शुट करत होती आणि तिच्याशी बोलत होती. शोएबही खूप मजा घेत होता.

व्हिडीओ बनवताना तिची ननंद सबा म्हणते, ये दूध सांडलं होतं. जसं सर्वांकडूनच सांडतं तसं. सावधानता हटी दुर्घटना घटी अशी ही बात आहे. यावर दीपिका म्हणते, माझ्यासोबत तर 90 टक्के असंच होत असतं. मी पहात असते की, आता दूध उकळणार आहे आणि नेमकं तेव्हाचं मी बिजी होत असते.