पोलीस निरीक्षकांच्या दालनात वाळूमाफियाचा ‘Birthday’ साजरा करणारे दोन पोलीस निलंबित

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस निरीक्षकांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणे दोन पोलिसांना भोवले आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या विनोद संतोष चौधरी आणि रवींद्र विठ्ठल जाधव या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी निलंबित केले.

ममुराबाद रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या वाळूमाफियाचा गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाढदिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी वाहतूक शाखेत कार्यरत असणारे चालक रवींद्र जाधव यांचाही वाढदिवस होता. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त निरीक्षकांच्या दालनात केक कापण्यात आला. दरम्यान, वाळूमाफिया व पोलीस यांच्यातील संबंध या प्रकरणामुळे उजेडात आले आहे. वाळूमाफियाचा केक कापणे पोलीस निरीक्षकासह दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे.

डबर, खडी व्यवसायात असलेल्या खासगी व्यक्तीचा वाढदिवस निरीक्षकांच्या दालनात साजरा करणे शिस्तीला धरून नाही. या प्रकरणामुळे पोलीस दलाची बदनामी झाली. विनोद चौधरी यांनी या खसगी व्यक्तीला मानलेला मावस भाऊ म्हटले आहे. त्यांनी केक आणण्याची व्यवस्था केली. बेशिस्तपणामुळे चौधरी व जाधव यांना निलंबीत करण्यात असून निलंबन काळात पोलीस मुख्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात पाच पोलिसांवर कारवाई केली. त्यात बाजार पेठ पोलीस ठाण्याचे योगेश माळी, शशिकांत तायडे व मुख्यालयातील कुणाल सोनवणे यांना निलंबित तर शनी पेठ पोलीस ठाण्यातील अनिल धांडे व रवींद्र गुरचळ या दोघांना मुख्यालयात पाठवण्यात आले. आठ दिवसात सात जणांवर करवाई करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून वाळूमाफियांशी संबंध असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

Loading...
You might also like