पिंपरीतील BVG च्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हाऊस किपिंग आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील नामांकीत असलेली कंपनी भारत विकास ग्रुप (BVG) वर आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. पिंपरीतील जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील कंपनीच्या मुख्य कार्य़ालय असून प्राप्तीकर विभागाच्या अधिकारी आज सकाळी अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून सकाळपासून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी दहाच्या सुमारास पिंपरीतील बीव्हीजी कार्यालयात प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी धाड टाकली. प्राप्तीकर विभागाचे 30 ते 40 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर सोडण्यात आले नाही. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले असून कार्यालयातील दुरध्वनी दखील बंद करण्यात येत आहे. त्यामुळे आतील कर्मचाऱ्यांना बाहेर संपर्क साधता येत नाही.

दरम्यान, प्राप्तीकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाड टाकल्याने बीव्हीजी कार्यालयाबाहेर बघ्यांनी गर्दी केली. प्राप्तीकर विभागाने बीव्हीजी कंपनीच्या पुणे, दिल्ली व मुंबई कार्यालयात एकाच वेळी धाड टाकली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भारत विकास ग्रुप ही कंपनी हाऊस किपिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी असून, राष्ट्रपती भवनासह देशातील अनेक शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या स्वच्छतेचं काम बी. व्ही. जी मार्फत केलं जातं. या कामाची प्रशंसा करत खुद्द शरद पवारांनीही बी. व्ही. जीचा जाहीर गौरव केला होता.

Visit : Policenama.com