लासलगाव कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

लासलगाव : वार्ताहर –  किरकोळ बाजारात कांद्याच्या दरामध्ये पन्नास रुपये प्रति किलोचा दर ओलांडतात केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने लासलगाव येथील ९ निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांवर मोर्चा वळविला आहे. येथील मुख्य बाजार आवारावर कांद्याचे दराने तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केले होती. दुसऱ्या टप्प्यात कांदा दराने साडे ४ हजार ८०० रुपयांचा दर ओलांडल्याने केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने ९ कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे

लासलगांव येथील कांदा व्यापरयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड़ी टाकल्या असून येथील ९ कांदा व्यापरयाच्या कार्यलय,घर ,गोडावून तपासणी सुरु आहे. कांद्याचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकार ने कांदा निर्यातीवर निर्बंध लादले असून देखील कांदा दर आटोक्यात येत नसल्याने आता कांदा व्यापार्यावर धाड़ सत्र टाकले जात आहे.यामुळे व्यापार्यामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.