Coronavirus : इंदापूरात 5 तर तालुक्यात एकुण 13 रूग्ण ‘पाॅझीटीव्ह’

इंदापूर (सुधाकर बोराटे) – पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यात बुधवार दि.१ जुलै 2020 रोजी जक्शंन, शेळगाव व इंदापूर येथे प्रत्येकी एक रूग्ण असे मीळुन तालुक्यात एकुण तीन रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह सापडले होते.व त्यांचे संपर्कात आलेले एकुण 37 लोकांना संशयीत म्हणून ताब्यात घेवुन होम कोरोंटाईन करण्यात आले होते.त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असता त्यापैकी एकुण 13 जण पाॅझीटीव्ह आढळुन आले असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक एकनाथ चंदनशिवे यांनी दीली.

पाॅझीटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे घशातील द्रवाचे नमुने कोरोना तपासणीसाठी दि.1 जुलै रोजी घेण्यात आले होते.त्यांचा तपासणी रिपोर्ट आज प्राप्त झाला असुन एकुण 37 जणांपैकी 13 जण पाॅझीटीव्ह सापडल्याने इंदापूर तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असुन नागरीकांनी घाबरून न जाता सुरक्षीततेची काळजी घ्यावी व सार्वजनिक ठीकाणी मास्कचा वापर करून दक्षता बाळगण्याचे आवाहन शासनाच्या वतीने तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.

तर इंदापूर तालुक्यातील जक्शंन येथे पाॅझीटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यापैकी 3जणांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आले आहेत.तर शेळगाव येथील 5 जणांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आले असुन इंदापूर शहरातील आणखी पाचजण पाॅझीटीव्ह आले असुन पाॅझीटीव्ह रूग्णांवर इंदापूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृृह येथे उपचार सूरू असल्याचे डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी पोलीसनामा प्रतिनिधी सुधाकर बोराटे यांचेशी बोलताना सांगीतले.