1000 गरजु कुटुंबाना इंदापूर तालुक्यात धान्य किट वाटप

इंदापूर – पुणे एस.जी.ॲनालीटीक्स, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी, रोटरी क्लब ऑफ पुना एअरपोर्ट,तसेच रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रॅनेट व्हिलेज यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील आठ गावातील हातावर पोटअसणाऱ्या आर्थिक दुर्बल गरजु लोकांना एक हजार जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहीती.राकेश गानबोटे यांनी दैनिक नवराष्ट्र प्रतिनीधीशी बोलताना दीली.

यावेळी पूणे एस. जी.अनालीटीक्सचे अध्यक्ष सुशांत गुप्ता,इंदापूर क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा संचालक वसंतराव मालुंजकर, अध्यक्ष राकेश गानबोटे, बिबवेवाडी क्लबचे अध्यक्ष नितीन मंच, सचिव अंकुश पारेख, प्रसन्न धारीवाल, फाल्गुन शहा, डॉ प्राची पंड्या, अरपोर्ट क्लबचे अध्यक्ष मनीष शहा, माजी अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे यांच्या हस्ते धाण्य कीट वाटप करण्यात आले. शिंदेवस्ती-विठ्ठलवाडी ता.इंदापूर येथून गरजुंना धाण्य कीट वाटपास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शिरसोडी, निमगाव केतकी, इंदापूर, वरकुटे खुर्द, पीठेवाडी, गलांडवाडी-१ व शेवटी कळाशी येथे कीट वाटप सांगता करण्यात आली.

सांगता समारंभात बोलताना सुशांत गुप्ता म्हणाले, कोरोना संचार बंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार झाली. कोरोना संचारबंदी शिथिल झाल्यानंतर देखील हीच परिस्थिती असल्याने सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदूमानून आम्ही या किटचे वाटप केल्याचे सांगीतले.तर प्रदीप गारटकर म्हणाले, सुशांत गुप्ता यांची संगणक कंपनी जग जवळ करते मात्र त्यांनी आज मानवधर्म केंद्रबिंदू मानून माणसेदेखील जवळ आणली. त्यांचा उपक्रम आदर्श व स्तुत्य आहे. यावेळी डॉ. जिग्नेश पंड्या यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन वरकुटे क्लब चे अध्यक्ष शशिकांत शेंडे यांनी केले.यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ,पूणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य महेंद्र रेडके, नगसेवक अनिकेत वाघ, असिफ बागवान, प्रशांत भिसे इत्यादी माण्यवर उपस्थित होते.