इंदापूर : गागरगाव नजीक दोन दुचाकीच्या धडकेत दोघे ठार

इंदापूर  : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –    गागरगाव (ता.इंदापूर) लोंढे वस्ती नजीक पूणे सोलापूर हायवे रोड लेनच्या लगत असलेल्या हाॅटेल समोरून मोटार सायकलवरून पूणे- सोलापूर लेन पास करताना पूण्याकडुन सोलापूर बाजुकडे जाणार्‍या मोटार सायकलला, मोटार सायकलने धडक दिल्याने अपघात घडला असुन अपघातात जखमी झालेल्या दोन मोरसायकल स्वारांचा इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णांलयामध्ये उपचारादरम्यान मृृत्यु झाल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

सुदाम बाळासाहेब देवकर (वय५५).रा.वरकुटे बु.ता.इंदापूर,जि.पूणे व अनिल दगडु पाटील (वय४५), रा.फ्लाॅट नं.१०, पिंपळारा रोड, निवृृत्तीनगर, जळगाव अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.तर अक्षय कांतीलाल मस्के (वय३०) रा.गागरगाव, ता.इंदापूर,जि.पूणे याने सुदाम बाळासाहेब देवकर याचे विरूद्ध अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे.

फीर्यादीत म्हटले आहे की बुधवार दिनांक ७ आक्टोंबर २०२० रोजी सायंकाळी ५:३० वा.चे. सुमारास मौजे गागरगाव, लोंढे वस्ती गावचे हद्दीत पूणे सोलापूर हायवे रोडचे पूणे सोलापूर लेनवर सुदाम देवकर याने त्याचे ताब्यातील एम.एच १२, ए.व्ही.१२२८ ही दुचाकी मोटार सायकल घेवुन निष्काळजी पणाने अचानक रस्ता क्राॅस करत असताना पूणे बाजुकडुन सोलापूर बाजुकडे जाणार्‍या एम.एच.१२, जे.यु.५५४६ अ‍ॅक्टीव या दुचाकी मोटार सायकलला धडक देवुन दोघांच्या मत्युस व दुचाकीच्या नुकसानीस कारणुभुत ठरल्याने त्याचे विरूद्ध अक्षय कांतीलाल मस्के रा. गागरगाव. याने इंदापूर पोलीसात फिर्याद दीली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत लोंढे हे करत आहे