भारतानं दिला WHO ला आणखी एक झटका, ‘कोरोना’ व्हायरसच्या उपचारासाठी उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीच्या लढाईमध्ये भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या विरुद्ध आवाज उठविला आहे. यावेळी भारताने आपल्या निर्देश आणि संशोधनाने जागतिक आरोग्य संघटनेला संकेत दिले आहे की, कोरोना व्हायसच्या लढाईमध्ये आता देश एकटाच लढणार आहे. देशाच्या हितासाठी जे शोध आणि उपचार असेल ते भारत करेल. यासोबतच भारताच्या वैज्ञानिकांनी हे स्पष्ट केले आहे की, त्यांना WHO च्या कोणत्याच सल्ल्याची गरज नाही. नुकतेच WHO सदस्यांनी देशांना निर्देश जारी केले होते की, कोरोना व्हायरसच्या उपचारामध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्कीन धोकादायक सिद्ध होऊ शकते. यासाठी याचा वापर बंद करा.

पण भारतातील वैज्ञानिकांनी फक्त या औषधांवरच उपचार केले नाही तर देशांच्या डॉक्टरांना सांगितले की, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी या औषधामुळे तुमचा बचाव होऊ शकतो. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने आपल्या संशोधनामध्ये सांगितले की, हायड्रोक्सीक्लोरोक्कीनचे औषध घेतल्याने कोरोना व्हायरस संक्रमणाचा धोका कमी पहायला मिळाला आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जास्तकरुन पश्चिम देशांचे वैज्ञानिक आणि औषध कंपनींनी भारताच्या खूपच स्वस्त औषधांच्या उपचाराबद्दल नेहमीच त्यांना खालीपणा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना व्हायरसचा उपचार मलेरियाच्या बचावासाठी बनलेल्या हायड्रोक्सीक्लोरोक्कीनने शक्य आहे.

जर कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी या औषधांचा उपयोग केला केला तर पश्चिम देशांच्या औषधांच्या कंपनीचे कोट्यावधींचे नुकसान होऊ शकते. हेच कारण आहे की, यांची लॉबी WHO वर दबाव बनून हायड्रोक्सीक्लोरोक्कीनचे सगळे प्रयत्न बंद करण्याच्या प्रयत्नेत आहे. याला भारताने विरोध केला आहे. उल्लेखनीय आहे की, कोरोना व्हायरस संक्रमण पसरण्यामध्ये WHO ला जबाबदार ठरवत आहे. स्वतः राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने देखील WHO च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. ही गोष्ट जगजाहीर झाली आहे की, WHO मध्ये औषध निर्माता कंपनी देखील वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. हेच कारण आहे की, यावेळी WHO च्या पोस्टवर सोशल मीडियावर लोक राग व्यक्त करत आहे.