भारतीय हवामान खात्याचा अलर्ट ! आगामी 24 तासांत वाढणार थंडीचा ‘कहर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान खात्यानं चेतावणी दिली आहे की, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, आणि पूर्व उत्तर प्रदेशातील भागात दाट धुकं असणारं आहे. 25 डिसेंबरनंतर थंडी अधिक वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. वेळेपूर्वी उत्तर भारतात थंडी आली आहे. अनेक वर्षांनंतर अशी थंडी कायम असल्याचं दिसत आहे. दिवसाही भयंकर थंडी जाणवत आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक थंडी 8 दिवसांपासून जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात तापमान 15 डिग्री सेल्सियसहून अधिक असणार नाही. पुढील तीन दिवस दाट धुके असेल.

हवामान खात्याची चेतावणी- हवामान खात्यानं सांगितलं आहे की, 25 डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थान या ठिकाणी थंडीची लाट अधिक तीव्र होणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये सकाळी काही ठिकाणी खूपच दाट धुके असणार आहे. पुढील 3 दिवस पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये थंडीचे दिवस गंभीर असण्याची शक्यता आहे.

पर्वतांमध्ये अवकाळी हिमवृष्टी झाल्यानं दिल्ली वेळेच्या 10 दिवस आधीच थंडीच्या कचाट्यात सापडली आहे. 16 डिसेंबरपासून लोक थंडीच्या लाटेनं परेशान आहेत. बर्फाळ वाऱ्यामुळे तापमानात अधिकच घसरण झाली. कमाल तापमान म्हणून 14.6 डिग्री सेल्सियसची नोंद झाली आहे. सामान्य तापमानाच्या 7 डिग्रीनं ही नोंद कमी झाली.

भारतीय हवामान खात्यानुसार, सोमवारी दाट धुके असणार आहे. कमाल तापमान केवळ 15 डिग्री सेल्सियस असेल. 26 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट अशीच कायम असणार आहे. परंतु मंगळवारपासून किमान तापमानात घसरण होईल आणि बुधवारी ते जवळपास 5 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/

You might also like