भारतीय वायुदलाचा मृत झालेला ‘तो’ वैमानिक महाराष्ट्राचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज बुधवारी सकाळी हवाई दलाच्या सरावाच्या दरम्यान जम्मू काश्मीर मधील बडगाम इथे कोसळलेल्या भारतीय वायू दलाचा मृत वैमानिक हा महाराष्ट्रातील असल्याचे वृत्त समोर आले आहे. स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे असे त्या वैमानिकाकाचे नाव असून ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयाचे रहिवाशी होते.

आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले होते त्यात वैमानिकाचा मृत्यू झाला होता. या घटने बाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातात मृत पावलेले वैमानिक निनाद हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचे विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांची निवड पुणे येथील एनडीए मध्ये झाली. एनडीएतील शिक्षण पूर्ण झाल्या नंतर ते भारतीय वायू दलात हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून रुजू झाले. आज बुधवारी मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

दरम्यान भारताच्या हवाई हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला असून पाकिस्तानने आज भारतावर लढाऊ विमाने पाठवली होती. त्या विमानांना भारतीय वायू सेनेने आकाशातूनच माघारी पिटाळून लावल्याने पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे.