Coronavirus : दिलासादायक बातमी ! देशातील रिकव्हरी रेट सुमारे 60 % , आतापर्यंत 3.4 लाख कोरोनाचे रूग्ण झत्तले बरे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत, परंतु रूग्ण बरे होण्याची संख्यादेखील वेगाने वाढत आहे. सध्या कोविड-19 आजारातून बरे होणार्‍या रूग्णांची संख्या 59 टक्क्यांवर पोहचली आहे. एकुण प्रकरणांमध्ये 59 टक्के लोक बरे झाले आहेत.

एक जुलैपर्यंत कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांची संख्या 59.43 टक्के आहे. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 5,85,493 आहे. ज्यापैकी 3,47,978 रूग्ण बरे झाले आहेत. भारत सरकारचे ट्विटर हँडल जे कोविड-19 च्या अधिकृत आकड्यांची माहिती देते, त्याने ट्विटद्वारे बरे झालेल्या रूग्णांचा एक ग्राफ शेयर केला आहे.

ट्विटमध्ये लिहिले आहे की, 25 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लावण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊननंतर देशात कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सरकारी डाटानुसार मार्चच्या अखेरीस कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा 7 टक्के होता जो मेच्या सुरूवातीला वाढून 26 टक्के झाला. 18 मेरोजी बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा 38 टक्क्यांपर्यंत पोहचला होता, जो महिन्याच्या अखेरीपर्यंत 47.7 टक्क्यांवर गेला होता. 1 जुलै 2020ला कोविड-19मधून बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा 60 टक्केच्या जवळ पोहचला आहे.

देशात कोरोनाची प्रकरणे 6 लाखांच्या जवळपास पोहचली आहेत आणि बुधवारी एका दिवसात कोरोनाची 18,653 नवी प्रकरणे समोर आली आणि 500पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 17,400 लोकांचा मृत्यू झाला आहे.