Video : भारतीय लष्करानं पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे केले ‘उध्दवस्त’, जारी केला हल्ल्याचा ‘ड्रोन’ व्हिडीओ

नई दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय सैन्याने शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याद्वारा युद्धबंदीच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर देत पाक व्याप्त काश्मीर (Pok) येथे दहशतवादी लाँच पॅडवर सटीक हल्ले केले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये बांधलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट झाले. सैन्याने या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ड्रोनने चित्रीत करण्यात आला आहे.

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की नियंत्रण रेषे (LOC) वर सैनिकांद्वारा टार्गेट केले गेलेले दहशतवादी लाँचपॅड पाकिस्तानच्या दुधनियाल भागात आहेत. या भागात बनवलेल्या लाँचपॅडचा वापर पाकिस्तान सैन्याने त्या पाच दहशतवाद्यांना लाँच करण्यासाठी केला होता ज्यांनी 1 एप्रिल रोजी केरन क्षेत्रात घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानी पोस्टही उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचा दारूगोळाही नष्ट झाला आहे.

5 एप्रिल रोजी ज्या पाचही दहशतवाद्यांना सैन्याच्या विशेष दलाने ठार केले होते. त्याचवेळी या गोळीबारात भारतीय लष्कराचे पाच विशेष दलाचे जवानही शहीद झाले. दरम्यान दहशतवाद्यांची नवी तुकडी तेथून घुसखोरी करण्यास सज्ज असल्याची माहिती लष्कराला मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय सीमेपलिकडे होणारा विनाश बराच मोठा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय सैन्याच्या अचूक जागांवर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. तेथे उपस्थित दहशतवाद्यांचे लाँच पॅड नष्ट झाले आहेत.