हैदराबादच्या स्टेडियमच्या एका स्टॅन्डला दिलं मोहम्मद अरूझद्दीनचं नाव

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममधील नॉर्थ स्टँडला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचे यांचे नाव देण्यात आले आहे. या स्टँडचे अनावरण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते झाले. वेस्ट इंडिज संघाच्या भारत दौऱ्यास आजपासून सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध विंडीज मालिकेतील पहिला टी-20 सामना आज हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर होत आहे.

मोहम्मद अझरुद्दिन हैदराबाद क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. अडीच वर्षा पूर्वी मोहम्मद अझरुद्दीन यांना काही तांत्रिक कारणामुळे हैदराबात क्रिकेट संघाच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करू दिली नव्हती. त्यानंतर या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अझरने भारतासाठी 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कालांतराने त्याच्यावरील ही बंदी बीसीसीआयने उठवली. मोहम्मद अझरुद्दीन हे काँग्रेसचे नेते असून लोकसभेत खासदार राहिले आहेत.

Visit : Policenama.com