पाकिस्तानचे एफ -१६ विमान पाडल्याचे भारताकडे पुरावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेल्याचे पुरावेच भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केले आहे.

तसेच हे एफ-16 विमान मिग-21 बिसॉन या विमानानेच पाडल्याचेही हवाई दलाने अधोरेखित केले आहे.
भारतीय वायुसेनाने अमेरिकेतील एका मासिकात छापलेला अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील मासिकात छापलेल्या वृत्तानुसार २७ फेब्रुवारी ला पाकिस्तानने एफ १६ विमान भारताविरुद्ध वापरले नाही. पाकिस्तानकडे असलेले सर्व एफ १६ विमान सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते.


भारतीय वायुसेनेने पाकिस्तानकडून एफ १६ विमानाचा वापर केल्याचे पुरावे दिले होते. आता भारतीय वायु सेनाने रडारचे (एअरबोर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टीम) छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.