‘इंडियन आयडल’ची स्पर्धक राहिलेल्या ‘सिंगर’ला 3 मुलांचा बाप असणाऱ्यानं पळवलं ! FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राजस्थानच्या अलवरची रहिवाशी इंडियन आयडल फेम 23 वर्षीय सिंगरला पळून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंगरच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सिंगरनं 2018 मध्ये इंडियन आयडलमध्ये भाग घेतला होता.

सिंगरच्या वडिलांच्या सांगण्यावरून आरोपी रोज सिंगरला तबला शिकवायला घरी येत असे. तिला फुस लावून आरोपीनं पळवून नेलं आहे असा सिंगरच्या घरच्यांचा आरोप आहे. तसंच आरोपी भरतपूर जिल्ह्यातील नगरचा रहिवाशी आहे.

महिला ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला ठाण्याचे प्रभारी चौथमल यांनी सांगितलं की, अलवरच्या रहिवाशानं हा खटला दाखल केला आहे. त्यांची मुलगी सिंगर आहे. तिनं इंडियन आयडलमध्येही भाग घेतला होता.

भरतपूरचा नगर निवासी तबला मास्तर हा सिंगरच्या घरी तीन वर्षांपासून तबला शिकवण्याचं आणि वाजवण्याचं काम करत होता. तो तीन मुलांचा बाप आहे.

पोलिसांच्या मते, 30 जून 2020 रोजी रात्री 9 वाजता तबला मास्तरानं सिंगरला फुस लावून पळवलं आहे. सिंगरचे दोन्ही मोबाईल नंबर बंद आहेत. हे नंबर आता सायबर सेलकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांचं लोकेशन ट्रेस केलं जाईल. सिंगर सापडल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

त्यांनी सांगितलं की, सिंगर आरोपी तबला मास्तर दोन्हीही प्रोढ आहेत. चौथमल यांनी असंही सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सिंगरचा शोध घेतला जातोय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like