सर्व्हे : लैंगिक संबंध ठेवण्यात हॉलंडमधील पुरुष ‘अग्रेसर’, तर भारतीय सर्वात मागे, जाणून घ्या इतरही इंट्रेस्टिंग गोष्टी

पोलिसनामा ऑनलाइन –अलीकडेच झालेल्या सर्व्हेमध्ये अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत. यात असं समोर आलं आहे की, भारतीय पुरुष संबंध ठेवण्याच्या बाबतीत सर्वात मागे आहेत.

भारतीय पुरुषांची संबंध ठेवण्याची सरासरी जर काढली तर ही आठवड्यात एकदाचीही नाहीये. आणखी बाब अशी की, भारतीय पुरुष सेक्स टॉईजचा वापर करण्यास खूप लाजतात. इतकंच नाही तर 48 भारतीय पुरुषांना वाटतं की त्यांची पार्टनर ऑर्गेजमचं नाटक करत आहे.

मेन्स हेल्थ या पुरुषांच्या मासिकानं एक सर्व्हे केला आहे यात या सर्व बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. 30 देशात प्रकाशित या मासिकाच्या ग्लोबल सर्व्हेत 50,796 लोकांचा समावेश होता. जगातील या प्रकारचा हा पहिलाच सर्व्हे आहे.

या सर्व्हेनुसार, सर्वात जास्त संबंध कोण ठेवत असेल तर हॉलंडमधील पुरुष. ते यात तरबेज असतात. क्रोशियाई लोकांना पब्लिक प्लेसमध्ये शरीर संबंध ठेवायला जास्त आवडतं. त्यांना पूल, हॉट टब्स, मैदान, बाग आणि गाडीत संबंध ठेवायल जास्त आवडतं.

या सर्व्हेमध्ये भारतीय सेक्स पार्टनर्सची संख्या फक्त 3 होती. तर क्रोएशियन लोकांची सरासरी संख्या 11 आणि ग्रीसच्या लोकांचती 9 होती. सर्वच संस्कृतीमधील पुरुष सहज उत्तेजित होतात असंही यातून समोर आलं आहे. महिलांच्या तुलनेत त्यांची वृत्ती सर्वात कामुक असते.