10 वर्षात सर्वात वेगवान ठरली ‘भारतीय फार्मा इंडस्ट्री’ची ‘ग्रोथ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या व्यापारी वर्षात दुसऱ्या तिमाहीत भारतीय औषध उद्योगात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील 10 तिमाहीत फार्मा इंडस्ट्रीची ग्रोथ सर्वात जास्त राहिली आहे. व्हॉल्युम ग्रोथमध्येही जबरदस्त वाढ पहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर व्हॉल्यूमध्ये 3.5 टक्के वाढ झाली आहे. या वाढलेल्या किंमतीचा ग्रोथमध्ये 5.6 टक्के सहभाग आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर तिमाहीची व्हॉल्युम ग्रोथ 3.2 टक्के राहिली आहे. 50 पैकी 30 कंपन्यांची ग्रोथ 10 टक्क्यांपेक्षा जास्त राहिली आहे. 50 पैकी 49 कंपन्यांची ग्रोथ पॉझिटीव होती. MNCs पेक्षा देशांतर्गत म्हणजेच घरगुती फार्मा कंपन्यांची ग्रोथ कमी होती. MNCsची ग्रोथ 13.5 टक्के आणि घरगुती कंपन्यांनची ग्रोथ 11.6 टक्के राहिली आहे.

Visit : Policenama.com