मोठी बातमी – नववर्षात रेल्वेकडून तिकीट दरात होणार ‘कपात’, ‘या’ लोकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येणाऱ्या नवीन वर्षात रेल्वे मालवाहतुकीचे भाडे कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रवासी भाडे मात्र वाढू शकते. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी याबद्दल स्पष्ट व्यक्तव्य केलं आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार प्रवासी आणि मालवाहतुकीचे भाडे लवकरच स्वस्त होणार आहेत. अर्थात जिथे भाडे कमी तिथे वाढवले जाईल आणि जिथे जास्त तिथे कमी केले जाईल. रेल्वे तिकिटात काही कपात केली जाऊ शकते, असे व्ही. के. यादव म्हणाले. याअगोदर २०१४ मध्ये सुमारे १५ टक्क्यांनी भाडे वाढवले होते. पण सध्याचे भाडे ४३ टक्के कमी आहे.

वाढविले जाणारे भाडे मालवाहतूक रस्त्याच्या क्षेत्रानुसार ठरवले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वेच्या अहवालानुसार ६६ टक्के महसूल कमी झाला आहे. २०१६-२०१७ मध्ये ४९१३ कोटी होते. ते प्रमाण २०१७-२०१८ मध्ये कमी होऊन १६६५.६१ कोटींपर्यंत आले आहे. रेल्वेची स्वतःची कमाईही ३ टक्के कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वेचे अर्थसंकल्पीय आधारावर अवलंबून राहणे वाढले आहे, असेही रेल्वेवरील अहवालात म्हटले आहे.

कॅगनुसार रेल्वेचे ऑपरेटिंग गुणोत्तर ९८.४४ होते. जेव्हा १०० रुपये मिळवण्यासाठी त्याला ९८ रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. म्हणजेच कॅगच्या अहवालात रेल्वेचे भाडे वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/