रेल्वेनं AC डब्यात केले बदल, जेणेकरून आपला प्रवास होईल ‘सुरक्षित’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संक्रमणाच्या दरम्यान रेल्वेने वातानुकूलित (एसी) गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी काही नवीन तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत. रेल्वेच्या डब्याच्या आत रूफ माउंटेड एसी पॅकेज बसविण्यात आले आहे. रेल्वे सूत्रांचा असा दावा आहे की यामुळे वातानुकूलित डब्यामध्ये ताजी हवा राहील आणि संक्रमणाचा धोका कमी होईल.

यापूर्वी कोणता धोका होता

अनेक प्रकारच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सेंट्रलाइज एसीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात होता. कोरोना संक्रमणाच्या दरम्यान विमानाची एसी सिस्टम देखील बदलली गेली होती.

रेल्वे डब्यात ऑपरेशन थिएटर सारखी ताजी हवा

रेल्वे अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे की नवीन व्यवस्थेनंतर वातानुकूलित डब्यामध्ये प्रवाशांना पूर्वीपेक्षा जास्त ताजी हवा मिळेल. रुग्णालयातील कोणत्याही ऑपरेशन थिएटरमध्ये एसीचा धोका कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने एसीचा वापर केला जातो, त्याच मार्गाचा उपयोग रेल्वेच्या डब्यातही केला जातो. याचा अर्थ असा आहे की रेल्वे डब्यामध्ये ऑपरेशन थिएटर सारखी ताजी हवा असेल.

प्रयोग म्हणून 15 एसी गाड्यांमध्ये ही सुविधा झाली सुरु

कोरोना संक्रमणाच्या दरम्यान रेल्वेचे सामान्य ऑपरेटिंग बंद आहे. असे असूनही मागील महिन्यात 12 मे पासून प्रयोग म्हणून 15 एसी गाड्यांमध्ये ही सुविधा सुरु झाली आहे. आतापर्यंतचे निकाल आश्वासक आहेत आणि आगामी काळात या सुविधेचा अधिकाधिक गाड्यांमध्ये समावेश करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

काय आहे नवीन तंत्रज्ञान

रेल्वेने या तंत्रज्ञानास रूफ माउंटेड एसी पॅकेज (आरएमपीयू) म्हटले आहे. या तंत्रज्ञानांतर्गत आरएमपीयूद्वारे प्रति तास 16 ते 18 वेळा हवेचे आदानप्रदान केले जाते. पूर्वीच्या प्रक्रियेत हवा बदलण्याचे काम प्रति तासात फक्त 6 ते 8 वेळा व्हायचे. नवीन तंत्रज्ञानामुळे डब्याच्या आत ताज्या हवेची मात्रा वाढेल, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल.

उर्जेचा वापर वाढेल

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बदलांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा वापरली जाईल. एका आकडेवारीनुसार नवीन तंत्रज्ञानामध्ये सुमारे 10 ते 15 टक्के अधिक ऊर्जा वापरली जाईल.

रेल्वे डब्याच्या आतील तापमान वाढवले

रेल्वेनेही डब्यामधील सेंट्रलाइज्ड एसीचे तापमान 23 अंशांवरून 25 अंशांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संशोधक आणि तज्ञांच्या सल्ल्याने रेल्वेने हे काम केले आहे.