‘पंतप्रधानांच्या 20 लाख कोटींपैकी माझ्या वाट्याला किती ?’, गुगल सर्च करण्यात गुजरात अव्वल

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्रा, या घोषणेनंतर एक अगदीच भन्नाट प्रश्न भारतीय गुगलवर सर्च करताना दिसत आहेत. मोदींच्या या भाषणानंतर काही तासांमध्ये जाहीर केलेल्या आर्थिक मदतीपैकी 130 कोटी भारतीयांपैकी प्रत्येकाच्या वाट्याला किती पैसे येतील हे अनेकांनी गुगलवर सर्च केले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात सर्वाधिक सर्च पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधून झाल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी भारतीयांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जागतिकीकरणात आत्मनिर्भरतेचा अर्थ बदललेला असेल. त्या अर्थाने 21 शतक भारताचेच असेल. भारत विश्वाला कुटुंब मानतो. देशाची आत्मनिर्भरता आत्मकेंद्रित कधीच नव्हती. टीबी, कुपोषण, पोलिओ विरोधातील लढा जगावर प्रभाव टाकतो.

भारताची औषधे जगाला नवी आशा देतात. जग भारताची प्रशंसा होते. मानवजातीच्या कल्याणासाठी 130 कोटी देशवासीयांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प विश्वाला बरेच काही देऊ शकतो, असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. तसेच 20 लाख कोटी आणि 130 कोटी या दोन्ही संख्यांचा उल्लेख केल्याने अनेक भारतीयांनी या आकड्यांचे गणित गुगलवर सर्च केले. आर्थिक मदतीचे सर्व पैसे भारतीयांनामध्ये वाटले तर प्रत्येकाला किती पैसे मिळतील किंवा 20 लाख कोटींपैकी माझ्या वाट्याला किती पैसे येतील या संदर्भातील सर्च केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील सर्च वाढल्याचे गुगल ट्रेण्डसवरुन दिसते. मंगळवार रात्रीपासून बुधवार आणि त्यानंतरही या गणितासंदर्भातील सर्चचे आकडे बर्‍याच प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.