‘या’ महिलेनं वर्षभरात पाणी ‘पिलं’ नाही, शरीरात झाले ‘हैराण’ करणारे ‘बदल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पाणी हे जीवन’ असे कायमच म्हणले जाते. परंतु तुम्हाला विश्वास बसेल का की एका महिलेने मागील 1 वर्षांपासून पाणीच प्यायले नाही आणि तरी ती जिवंत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे की तिने मागील 1 वर्षांपासून पाणीच प्यायले नाही आणि त्यामुळे तिच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत.

या 35 वर्षीय महिलेचे नाव सोफी पार्तिक आहे. ती व्यवसायाने योगा टीचर आणि न्यूट्रीशियनिस्ट (आहार तज्ज्ञ) आहे. सोफीचा दावा आहे की तिने मागील एक वर्षांपासून पाणीच प्यायले नाही. यामुळे तिच्या आरोग्यात बरीच सुधारणा झाली आणि ती पहिल्यापेक्षा जास्त तंदुरुस्त झाली. पाण्याऐवजी ती फळं खाते आणि ज्यूस पिते. याशिवाय ती नारळ पाणी देखील पिते.

सोफी सांगते की ती पहिल्यांदा चेहऱ्यावर सूज, फूड अ‍ॅलर्जी, त्वचा आणि पचन क्रियेमुळे त्रस्त होती. बरेच उपाय केले परंतु फायदा झाला नाही. यानंतर एका मैत्रिणीने तिला ड्राय फास्टिंग करण्यास सांगितले. ड्राय फास्टिंग म्हणजे पाण्याशिवाय राहायचे. ती म्हणाली की यामुळे तिला बराच आराम मिळाला.

ती आतापर्यंत कोणताही द्रवपदार्थ न घेता 52 तास राहिली आहे. आता तिला कोणत्याही द्रव पदार्थशिवाय 10 दिवस राहायचे आहे. पाण्याबद्दल सोफीचा विचार पूर्ण बदलला आहे. तिचे म्हणणे आहे की लोकांच्या मनाचा हा भ्रम आहे की लोक पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. जर आपण संयम ठेवला तर आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो.

सोफी म्हणाली की तिचे कुटूंब देखील हैराण आहे की ती इतके दिवस पाण्याशिवाय कशी जिवंत राहते. सोफी म्हणते की ड्राय फास्टिंग करुन तिला जाणीव झाली की तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता नाही, आपण पाण्याशिवाय जगू शकतो.

You might also like