संजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला – ‘टीम इंडियात त्याला पुर्ण संधी मिळत नाही ही हैराण करणारी गोष्ट’

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा सीझन सुरू असून भारतीय खेळाडू या सीझनमध्ये जोरदार कामगिरी करत आहेत. भारतीय विकेटकीपर, फलंदाज संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्सच्या विरूद्ध खेळलेल्या मॅचमध्ये 32 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी करून आपली कामगिरी मांडली. मात्र, हे सुद्धा सत्य आहे की, हा भारतीय विकेटकीपर फलंदाज टीम इंडियासाठी अजूनपर्यंत सर्व स्वरूपात आपले स्थान निर्माण करू शकलेला नाही. यावरूनच ऑस्ट्रेलियन टीमचा महान स्पिनर शेन वॉर्नने मोठे वक्तव्य करताना म्हटले की, मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, या टॅलेंटेड खेळाडूला अजूनपर्यंत भारतीय टीमच्या सर्व स्वरूपात खेळण्याची संधी का मिळालेली नाही.

शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सच्या इंस्टाग्राम लाइव्हवर म्हटले, संजू सॅमसन जबरदस्त खेळाडू आहे. मला वाटते की, मोठ्या कालावधीनंतर असा खेळाडू झाला आहे आणि मी ही गोष्ट मोठ्या कालावधीपासून बोलत आहे. मला आश्चर्य वाटते की, भारतीय टीमसाठी हा खेळाडू अजूनपर्यंत सर्व स्वरूपात खेळताना का दिसत नाही. संजू खुप चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ते सर्व शॉट आहेत, जे एखाद्या खेळाडूला महान बनवतात. मला विश्वास आहे की, लागोपाठ चांगली कामगिरी करून रॉयल्सला आयपीएल जिंकण्यास तो मदत करेल. मला आशा आहे की भारतासाठी त्यास तीनही स्वरूपात खेळताना पाहीन.

राजस्थान रॉयल्सची टीम आपल्या दुसर्‍या मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करणार आहे, लीगची नववी मॅच शारजाहच्या मैदानावर खेळवली जाईल. जेथे राजस्थान रॉयल्सची टीम चेन्नईच्या विरूद्ध आपली पहिली मॅच जिंकून येत असेल तर किंग्स इलेव्हन पंजाबसाठी कॅप्टन केएल राहुलने शतक ठोकून आरसीबीच्या विरूद्ध विजय देण्याचे काम केले आहे.

अशात रविवारी होणार्‍या या सामन्यात उत्सुकता असणार आहे. राजस्थानच्या टीममध्ये जोस बटलरसुद्धा परतत आहे, जो मागच्या मॅचमध्ये उपलब्ध नव्हता. शारजाहमध्ये मैदान छोटे असल्याने दोन्ही संघ मोठे-मोठे शॉट खेळताना दिसू शकतात.