IPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी केलं सूचक वक्तव्य, आयपीएलमध्ये एवढया धावा काढणार असल्याचा बांधला अंदाज

पोलिसनामा ऑनलाईन – इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ ११ सामन्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.झालेल्या तीन सामन्यात आरसीबी संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात हार पत्करली.यावेळी कर्णधार विराट कोहलीने तीन सामन्यात प्रत्येकी १४, १ आणि ३ धावा केल्या.विराटच्या खराब प्रदर्शनाद्द्ल त्याचे चाहते सुद्धा चिंतेत आहेत,विराटच्या प्रदर्शनाबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले की,विराटने तीन सामन्यांमध्ये धावा काढल्या नाहीत तर काय होईल..? गावसकरांचा विश्वास आहे, की तो लवकरच तो चांगले प्रदर्शन करणार आहे.

आरसीबीने २८ सप्टेंबर रोजी अखेरच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला.आयपीएलमधील सर्वाधिक धावांची नोंद ही विराट च्या नावाने नोंदली गेली आहेत.२०१६ च्या सत्रात विराटने ८१.०८ च्या सरासरीने ९७३ धावा काढल्या,ज्यात चार शतकेही होती. विराटने आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रमही केला आहे.विराट देखील त्याच्या खराब प्रदर्शनासाठी समीक्षकांचे लक्ष्य ठरला आहे.या हंगामात विराटच्या फलंदाजीद्वारे सुमारे ४०० – ५०० धावा काढतील असा अंदाज गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. आरसीबीच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर गावस्कर म्हणाले की, “तो एक चांगला खेळाडू आहे आणि तो सर्व जाणतो.” त्याने तीन सामन्यांत धावा नाही केल्या तर काय झाले,तो स्पर्धेच्या अखेरीस कार्य पूर्ण करणार.

तो पुढे म्हणाला, “त्याने हळुवारपणे सुरुवात केली असेल, परंतु या स्पर्धेच्या अखेरीस त्याच्या खात्यात ४०० – ५०० धावा असतील.” एक असे वर्ष होते कि त्याने त्याने सुमारे १००० धावा केल्या. आयपीएल २०२० मध्ये त्याला कदाचित ९०० धावा नाही करता आल्या,पण तो ५०० धावा नक्की करेल. आरसीबीचे चाहतेदेखील कर्णधार विराट आपले नक्कीच चांगले प्रदर्शन करेल अशी अशा धरून परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शनिवारी आरसीबी आपला पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.