IPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’ टीमचा हेड कोच!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IPL 2022 मध्ये अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) या दोन संघाचा समावेश होणार आहे. लवकरच आयपीएलचे (IPL 2022) मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी या दोन्ही संघाना प्रत्येकी 3 खेळाडू ड्राफ्टमधून निवडता येणार आहेत. याबरोबर या दोन्ही संघाचे हेड कोच कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. लखनऊ फ्रँचायझीच्या टीमचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) होणार अशी शक्यता आहे. तर या टीमच्या हेड कोच पदासाठी 2 नावं आघाडीवर असून यापैकी एक नाव विराट कोहलीच्या (Virat Kohli) माजी कॅप्टनचं आहे.

 

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) टीमचा माजी कॅप्टन आणि न्यूझीलंडचा (New Zealand) ऑल राऊंडर डॅनिएल व्हिटोरी (Daniel Vettiori) याचे नाव सध्या हेड कोच पदासाठी आघाडीवर आहे. डॅनिएल व्हिटोरी याच्यासोबत इंग्लंड (England) टीमचे माजी हेड कोच अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांच्यादेखील नावाची चर्चा आहे. यांच्याबरोबर टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) ट्रेवर बेलिस (Trevor Bayliss) यांच्या देखील नावाची चर्चा होती पण त्यांचा फायनल लिस्टमध्ये समावेश करण्यात आला नाही. (IPL 2022)

अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांनी याअगोदर केएल राहुलसोबत काम केले आहे. अँडी फ्लॉवर हे याअगोदर पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचे असिस्टंट कोच होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अँडी फ्लॉवर यांना जगभरातील टी20 लीगमधील टीमचा हेड कोच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

 

Web Title :- IPL 2022 | ipl 2022 daniel vettori and andy flower in race of head coach of lucknow franchise

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या चौघांना अटक; दरोड्याचा गुन्हा दाखल

Online Games आता झाले ‘जुगार’ आणि ‘सट्टा’, लागू व्हावा समान कर ! 43 कोटींपेक्षा जास्त यूजर्स खेळतात ऑनलाइन गेम

Indian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना कधीपासून मिळेल सूट? रेल्वे मंत्र्यांनी संसदेत दिले उत्तर

Satara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश