ताज्या बातम्याराष्ट्रीय

Online Games आता झाले ‘जुगार’ आणि ‘सट्टा’, लागू व्हावा समान कर ! 43 कोटींपेक्षा जास्त यूजर्स खेळतात ऑनलाइन गेम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Online Games | भाजपाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Former BJP leader and former Bihar Deputy Chief Minister Sushil Kumar Modi) यांनी तरूणांचा ऑनलाइन गेम (Online Games) मध्ये वाढता कल पाहून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान मुलांचा ऑनलाइन गेमकडे कल जास्त वाढला. ज्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत केंद्र सरकार (central government) कडे मागणी केली की, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावेशक धोरण बनवण्यात यावे.

 

राज्यसभेत (Rajya Sabha) शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी म्हटले की, ऑनलाइन गेमिंग आता जुगार आणि सट्ट्यात रूपांतरीत झाले आहे (online gaming has now turned into gambling and betting). यावर समान कर लागू करण्यात यावा. सुशील मोदी यांच्या या मागणीची राज्यसभेचे सभापती एम. वेंकैया नायडू (Rajya Sabha Speaker M. Venkaiah Naidu) यांनीही गंभीर दखल घेतली आणि सभागृहात उपस्थित दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Telecommunications, Electronics and Information Technology Minister Ashwini Vaishnav) यांना म्हटले की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि कायदा मंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक पावले उचलावीत. (Online Games)

43 कोटीपेक्षा जास्त यूजर्स खेळतात ऑनलाइन गेम

सुशील मोदी यांनी माहिती देताना म्हटले की, लॉकडाऊननंतर 43 कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते ऑनलाइन गेम खेळत आहेत (after the lockdown, more than 43 crore users are playing online games). 2025 हा आकडा 65.7 कोटी होईल. ऑनलाइन गेमिंगमुळे या उद्योगाने 43.3 कोटी वापरकर्त्यांची या आर्थिक वर्षात 13,600 कोटी रुपये कमाई गेली आहे आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा अंदाज 65.7 कोटी वापरकर्त्यांकडून कमाई 29,000 कोटी पोहचू शकते.

 

गेम डाऊनलोडच्या संख्येत सुद्धा झाली वाढ

मोदी यांनी म्हटले की, तेलंगना, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडु सारख्या राज्यांनी ऑनलाइन गेमवर प्रतिबंध लावले होते.
परंतु या राज्यांच्या संबंधित उच्च न्यायालयांनी ते फेटाळले. यावर लवकरात लवकर कायदा केला पाहिजे.
अन्यथा देशातील कोट्यवधी मुलांना आपण ऑनलाइन गेमच्या सवयीपासून रोखू शकणार नाही.

 

देशात आज कोट्यवधी तरूण लूडो किंग (ludo king), रमी (rummy game app), पोकर (poker game app)
आणि ड्रीम 11 – Dream 11(online games like Ludo King, Rummy, Poker and Dream 11) सारखे ऑनलाइन खेळ खेळत आहेत.
जे डाऊनलोड करण्यात मोठी वाढ झाली आहे.

 

Web Title :- Online Games | online gaming has now become gambling and betting apply the same tax sushil modi suggestion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Satara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश

Pune News | भारतातील पहिलीच घटना चक्क ‘इनक्यूबेटर’मध्ये मोरांचा जन्म

Back to top button