Pune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या चौघांना अटक; दरोड्याचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बाजीराव रोडवरील (Bajirao Raod, Pune) चितळे चौकातून पायी जाणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेण्याचा प्रकार भरदिवसा घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) दरोड्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) करुन चौघांना अटक केली आहे.

 

अली अजगर इकबाल नजे (वय ३८, रा. रोहिदास वाडा, ठाणे), यासीन इमाम शेख (वय २४, रा. हाजी मलंगवाडी, अंबरनाथ, ठाणे), राज ऊर्फ राजेश राधेश्याम सिंग (वय ३५, रा. चेंबूर, वाशीनाका), रवींद्र वसंत पांचाळ (वय ५०, रा. काळा तलाव, कल्याण (प.) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी प्रकाश उपळकर (वय ५९, रा. शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपळकर हे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चितळे चौक येथील शालगर दुकानाचे समोरील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी घरी जात होते. त्यांच्याकडील कापडी पिशवीत ५० हजार रुपये होते. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते पायी जात असताना आरोपी मोटारसायकलवरुन पाठीमागून आले. त्यांच्या हातातील पैसे असलेली कापडी पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली व ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने परिसरातील CCTV फुटेज तपासले. त्यात हि घटना कैद झाली होती. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक (Pune Crime) केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Four arrested for robbing senior citizen on Bajirao Road in Pune; Filed a robbery charge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Online Games आता झाले ‘जुगार’ आणि ‘सट्टा’, लागू व्हावा समान कर ! 43 कोटींपेक्षा जास्त यूजर्स खेळतात ऑनलाइन गेम

Indian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना कधीपासून मिळेल सूट? रेल्वे मंत्र्यांनी संसदेत दिले उत्तर

Satara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश

Corporator Avinash Bagwe | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; कोर्टाकडून ‘त्या’साठी 6 आठवड्यांची मुदत