प्रेरणादायी ! ‘तु हो म्हणालीस तर जग बदलेल मी’ असं म्हंटलं ‘या’ व्यक्तीनं अन् बनले IPS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पश्चिम मुंबईचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या मनोज शर्मा यांची एक रंजक कहाणी समोर आली आहे ज्यावर त्यांच्याच एका मित्राने ’12th फेल, हारा वही जो लड़ा नहीं’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यात शर्मा यांचा जन्म झाला होता. शर्मा हे शालेय शिक्षणात नववी ते अकरावीपर्यंत तिसऱ्या रँकमध्ये पास झाले होते तेही कॉपी करून आणि बारावीला कॉपी करता न आल्यामुळे ते बारावीमध्ये नापास झाले होते.

गर्लफ्रेंड से कहा- तुम हां कर दो तो दुनिया पलट दूंगा... और ये शख्स बन गया IPS

एका मुलाखतीदरम्यान मनोज शर्मा यांनी सांगितले होते की बारावीत कॉपी करून पास होणार असल्याचे त्यांनी ठरवले होते मात्र प्रशासनातील एका अधिकाऱ्यामुळे आम्हाला कॉपी करता आली नाही तेव्हा मला वाटले की आपल्याकडे सुद्धा अशी पावर पाहिजे. त्यानंतर बारावी नापास झाल्यामुळे मी भावासोबत टेम्पो चालवू लागलो मात्र एकदा आमचा टेम्पो पकडला तेव्हा मी एसडीएम अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यांना टेम्पो बाबत विचारण्याऐवजी मी तुम्ही अधिकारी होण्यासाठी काय तयारी केली असे विचारले असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

शर्मा यांनी सांगितले की त्यानंतर ते ग्वालियरला गेले तिथे त्यांनी खूप हालाकीच्या परिस्थतीतीचा सामना केला. खाण्याचे वांदे असल्यामुळे कधी कधी मंदिरातील भिकाऱ्यांसोबत रात्र देखील काढली. ते म्हणतात सुदैवाने मला एक वाचनालय मिळाले आणि तिथेच शिपायाची नोकरी देखील मिळाली.

गर्लफ्रेंड से कहा- तुम हां कर दो तो दुनिया पलट दूंगा... और ये शख्स बन गया IPS

त्यानंतर त्यांनी एसडीएम होण्याचे ठरवले मात्र बारावी नापास असल्याचा शिक्का त्यांच्यावर होता एवढेच नाही तर त्यांना आवडत असलेल्या मुलीला देखील ते काही विचारू शकत नव्हते कारण बारावी नापास असलेली खंत त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी अभ्यास देखील सुरु केला.

त्यानंतर मोठा संघर्ष करून ते दिल्लीला पोहचले. मात्र पैशांची गरज असल्यामुळे मोठ्या घरांमध्ये ते कुत्र्यांना फिरवून आणण्याचे काम करायचे तेव्हा त्यांना प्रत्येक कुत्र्यामागे 400 रुपये मिळायचे. त्यात ते एका मुलीच्या प्रेमात देखील पडले होते. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते प्रवेश परीक्षा पास झाले मात्र त्यानंतरच्या मुख्य परीक्षेत तीन वेळा त्यांना अपयश आले. ते सांगतात, त्यांची इंग्रजी चांगली नसल्यामुळे एकदा त्यांनी शंभर गुणांसाठी टुरिजम या विषयावर निबंध लिहिण्याऐवजी टेरेरिजम या विषयावर निबंध लिहिला.

शर्मा यांनी त्यांना आवडत असलेल्या मुलीला सांगितले की, जर तू मला हो म्हणालीस तर मी जग सुद्धा बदलू शकतो त्यानंतर त्यांच्या आयुष्याने मोठा यु टर्न घेतला आणि प्रेयसी हो बोलल्याने ते पुन्हा अभ्यासाला लागले आणि चवथ्या प्रयत्नात आयपीएसची मुख्य परीक्षा पास केली.

मनोज शर्मा यांच्यावर पुस्तक लिहीणाऱ्या अनुराग पाठक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, जेव्हा मुलं पास होत नाहीत तेव्हा तणावाखाली जातात त्यामुळे आजच्या तरुणाईला यांची कहाणी कळणे फार गरजेचे आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या