IRCTC नं घेतले प्रवाशांचे पत्ते नोंदवून

नवी दिल्ली – देशातील परिस्थिती सुधारत असून, रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. श्रमिक रेल्वेंसोबतच सामान्य प्रवाशांसाठीही प्रवासी गाड्या रेल्वेने सुरू केल्या आहेत. त्यामुळे देशातील दळणवळणाला चालना मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 मेपासून रेल्वेने प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचा पत्ताही तिकिट बुकिंगच्यावेळी नोंदवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांने चुकून प्रवास केला तर नंतर त्याचा माग काढण्याच्या दृष्टिने सोयीचे पडावे यासाठी हा पत्ता नोंदवून घेत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. याआधी रेल्वेचे तिकीट काढताना पत्ता देण्याची गरज भासत नव्हती पण सुरक्षिततेचा उपाय म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.